माझ युद्ध त्यांच्याशी आहे ज्यांनी मुंडे साहेबांना कायम हरवण्याचा प्रयत्न केला – पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल भावाची गळाभेट घेतल्यानंतर आज भाऊ धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काल ( १० एप्रिल ) दोघा भाऊ- बहिणीने एका मंचावर येत गळाभेट घेतली होती मात्र आज दोघांनीही एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

दरम्यान, पुण्यात झालेल्या हल्लाबोल यात्रेच्या सभेत माझ्या बहिणीने लहान मुलांच्या चिक्की खाल्या या घोटाळ्याचे पुरावे मी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले. मात्र त्यावर मुख्यमंत्री गप्प आहेत. अस म्हणत धनंजय मुंडे यांनी बहिणीवर जोरदार आरोप केले आहेत.

तर, अहमदनगर जिल्ह्यातील वंजारवाडी गावात झालेल्या सभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना नाव न घेता प्रत्युत्तर दिल आहे. माझ नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न होत आहे पण जोपर्यंत मी तुमच्या मनात आहे तोपर्यंत माझ्या नेतृत्वाला हात लावू शकत नाही, तर माझ युद्ध छोट्या मोठ्यांशी नाहीये माझ युद्ध त्यांच्याशी आहे ज्यांनी मुंडे साहेबांना कायम हरवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पण पण तुमची साथ आहे त्यामुळे मी त्यांना पुरून उरेन अस म्हणत धनंजय मुंडेना टोला लगावला आहे.

पहा पंकजा मुंडे यांचे संपूर्ण भाषण