काँग्रेस हा मावळतीला आलेला पक्ष आहे,पंकजा मुंडेंचा घणाघात

टीम महाराष्ट्र देशा- पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे सध्या राजकारण तापले आहे. मतदारांचा कौल आपल्याच मिळावा यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. अनेक स्टार प्रचारक सभा गाजवत असून महाराष्ट्रातून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या प्रभावी भाषणाने मध्य प्रदेशातील जनतेचीही मने जिंकली.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या समवेतच्या महू येथील सभेसह अन्य तीन ठिकाणी झालेल्या त्यांच्या प्रचार सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची उत्कृष्ट कामगिरी आणि शिवराजसिंह चौहान यांच्या कार्यकाळात मध्यप्रदेशचा झालेला सर्वांगिण विकास यावर जोर दिला. काँग्रेस हा मावळतीला आलेला पक्ष आहे, त्यांच्याकडे भाजपवर टिका करण्याशिवाय दुसरा कोणताही अजेंडा नसल्याचे त्या म्हणाल्या. भाजप सरकारलाच पुन्हा सत्तेवर आणण्याची जबाबदारी तुमची आहे असे त्या म्हणाल्या.

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे करणार जोरदार शक्तीप्रदर्शन !

गाफील राष्ट्रवादीला पंकजा मुंडेंचा दणका!