…कारण बहीण भावात प्रेम असते की नसते हे मला माहीत नाही – पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा: “फुंडकर काका मी आकाशची मोठी बहीण आहे, मोठी बहीण ही आई सारखी असते, मी आईप्रमाणे त्याच्यावर प्रेम करेल कारण बहीण भावात प्रेम असते की नसते हे मला माहीत नाही” अस म्हणत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नाव घेता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर निशाना शाधला आहे.

खामगाव मतदार संघातील विविध गावांच्या पाणी पुरवठा योजना आणि रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकिय निवासस्थानांचा भूमिपूजन कार्यक्रमावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या यावेळी होत्या.कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर त्यांचा मुलगा आमदार आकाश फुंडकर आदी उपस्थित होते.

यावेळी पंकजा मुंडे यांनी आकाश फुंडकर यांना मंत्रिपद देण्याचा शब्द सुधा दिला त्या म्हणाल्या, “मी लहानपणी बाबांसोबत भाऊसाहेबांच्या घरी येत असे. तेव्हापासून भाऊसाहेबांची मुले आकाश आणि सागर सोबत भाऊ बहिणीच्या नात्याप्रमाणे राहिले. सागर शांत तर आकाश बंड होता. तेव्हाच तो आमदार होईल असे वाटले होते. कोअर कमिटीत असताना मी आकाशला तिकीट मिळावे याकरीता आग्रह धरला. आता आकाश आमदार असून भाऊसाहेब राज्यातील सर्वात सिनिअर मंत्री आहेत. पुढे आकाशलाच मंत्री करून टाकू “

Gadgil