fbpx

प्रियंंका गांधींचं राजकारणात स्वागतच आहे – पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : प्रियंंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाची का एवढी चर्चा होते तेच कळत नाही ? त्या आधीही राजकारणात होत्याच. प्रचारही करत होत्या. त्यामुळे त्याचा भाजपवर काहीही परिणाम होणार नाही. महिला राजकारणात येणार असल्याने त्याचा फायदा समाजाला होत असतो. एक महिला राजकारणात येत असेल तर त्याचं स्वागतच आहे. अस मत राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. ‘न्यूज18 लोकमत’च्या न्यूज रूम चर्चा या कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

दरम्यान,प्रियंंका गांधी यांना कॉंग्रेसने सरचिटणीस करून नवी जबाबदारी दिली आहे.प्रियंंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर पातळी सोडून एकाच टीकेची झोड उठवली आहे. मात्र दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी त्याचं स्वागत करून राजकारणातील सुसंकृतपणा जपला आहे.

 

1 Comment

Click here to post a comment