अहमदनगर : सगळ्यांचे लक्ष आजच्या दसरा मेळाव्यावर लागले आहे. यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच या दसरा मेळाव्यावरून विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये एकमेकांवक आरोप, टोलेबाजी करण्याची चढाओढ लागली असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच भाजप (BJP) पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे(Pankja Munde) यांनी दसरा मेळाव्यावरून (Dasara Melava) एक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्हीपैकी कोणत्या दसऱ्या मेळाव्यातील भाषण ऐकण्याची उत्सुकता आहे?, असा सवाल पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की,मुंबईत आज दोन मेळावे होणार आहेत. हे मेळावे प्रचंड ताकदीने होत आहेत. सर्वांचे लक्ष या मेळाव्याकडे आहे. सर्व माध्यमांचं लक्ष या मेळाव्याकडे आहे. म्हणून मी दोघांनाही शुभेच्छा देते. आज पंकजा मुंडे यांचा भागवान गडावर दसरा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
शिवसेनेतील सर्व गोष्टींकडे मी कुतुहलाने बघते. कारण मी या गोष्टीतून गेले आहे. मी एका मेळाव्याचं सीमोल्लंघन करून दुसऱ्या मेळाव्याचं स्थान निर्माण केलं आहे. तुम्ही सावकरगावचं आमचं भगवान बाबांचं मंदिर बघितलं पाहिजे. आम्ही अत्यंत सुंदर आणि देखणं मंदिर उभं केलं आहे. तसंच मी या दोघांकडे कुतुहलाने बघते. आज त्यांच्यासाठी सिमोल्लंघनाचा खरा दिवस आहे. ते विषयांचं आणि जनतेच्या प्रश्नांचं सीमोल्लंघन करतील अशी अपेक्षा आहे.
तसेच, दुसरीकडे एकदम वेगळा दसरा मेळावा जिथं खुर्च्या मांडलेल्या नाहीत, डोंगर कपारीतील हा माझा मेळावा आहे. त्यामुळे हे तीन वेगवेगळे मेळावे होत आहेत आणि मोहन भागवत यांचं मार्गदर्शन असा हा दिवस वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेला आहे. जनता हुशार आहे, ते सर्व पाहत असल्याचं मुंडे यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या :
- Jasprit Bumrah । टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर गेल्यानंतर बुमराहनं मौन सोडलं; हृदय जिंकणारा संदेश शेअर केला
- Shivsena । आदित्य ठाकरेंनी सांभाळून बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
- Shivsena । दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात; ८ ते १० गाड्या एकमेकांवर आदळल्या
- Weight Loss Tips | दररोज ‘ही’ योगासने केल्यामुळे होऊ शकते पोटावरील चरबी कमी
- INC । “शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या बसेससाठी १० कोटी रुपये कुठून आणले?, ही मनी लाँडरींग तर नाही ना?”; काँग्रेसची मागणी