fbpx

त्यावेळी मोठा भाऊ म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता तर आज चित्र वेगळ असतं – पंकजा मुंडे

pankaja munde and dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा : ज्यावेळी वडील गोपीनाथ मुंडे गेले, त्यावेळी मोठा भाऊ म्हणून धनंजय यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता, कुटुंबाला आधार दिला असता तर कदाचित आज वेगळे चित्र असते. पण ते माझ्या विरोधात निवडणूक लढले. त्यांनी माझ्यावर खोटे नाटे आरोप करून मला त्रास दिला. विरोधी पक्षनेतेपदाचा वापरही त्यांनी केवळ मला त्रास देण्यासाठीच केला. पण त्या आरोपातून मी तावून सुलाखून बाहेर पडले. या काळात माझा पक्ष पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. आता माझा राजकीय संघर्ष संपला असून धनंजय मुंडे यांचा संघर्ष सुरू झाला असल्याच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्या पत्रकारांशी सुयोग निवासस्थानी बोलत होत्या.

तर, आपल्याला केवळ ओबीसींचे नाही तर जातीपातीच्या पुढे जाऊन राज्याचे नेतृत्व करायचे असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी आपल्याला मंत्री करेल म्हणून धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडला. मात्र राष्ट्रवादीने त्यांना काही दिले नाही. मात्र मी मंत्री झाल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही मुंडे यांना आपल्यामुळेच मिळाले, असा टोला पंकजा मुंडे यांनी लागावला