इव्हिएमवर आरोप करणाऱ्यांच्या बुद्धीची कीवं येते ; पंकजा मुंडे

blank

टीम महाराष्ट्र देशा : इव्हिएमवर आरोप करणाऱ्यांच्या बुद्धीची कीवं येते. असे वक्तव्य ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. तसेच, इव्हिएमवर शंका व्यक्त करणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. असेही त्यांनी म्हंटले. एका वृत्तवाहिनीशी त्या बोलत होत्या.

देशात लोकसभा निवडणूक आताच पार पडली. येत्या २३ मे ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याचदरम्यान पंकज मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी, विरोधकांकडून इव्हिएमवर शंका व्यक्त करण्यात येत आहे. असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी विरोधकांच्या या आरोपाला काही अर्थ नाही. इव्हिएमवर शंका व्यक्त करणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. असे पंकजा मुंडे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्याठिकाणी भाजपला कमी मतं पडली. तिथे त्यांची सत्ता आली. त्यावेळी त्यांनी जल्लोष केला. तेंव्हा इव्हिएम बरोबर होतं. तेंव्हा इव्हिएमचा घोटाळा नव्हता. आणि आता कौल भाजपच्या बाजूने लागत आहे, तर लगेच इव्हिएम घोटाळा. विरोधकांचा हा आरोप हास्यास्पद आहे. मला त्यांच्या बुद्धीची कीव येते. असेही पंकजा मुंडे यांनी म्हंटले.

याचबरोबर, लोकसभा निवडणुकीत राज्यात किती जागा मिळतील याबाबत त्यांना विचारले असता, राज्यात ३८ ते ४० जागा युतीला मिळणार आहेत. तसेच माझ्यावर मराठवाड्यातील जबाबदारी होती. आणि ज्या प्रमाणे मराठवाड्यात मतदान झालं त्यावरून मराठवाड्यातील सातही जागेवर आमचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.