धनंजय मुंडेना लहान पणापासून ओळखते, खोटं बोल पण रेटून बोल एवढंच त्यांच काम : पंकजा मुंडे

pankaja munde and dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा :  विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या टीकेला ग्रामविकासमंत्री पंकज मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर आरोप करणे आणि खोटं बोल पण रेटून बोल हे धनंजय मुंडेंचं एकमेव ध्येय आहे. अशी टीका पंकज मुंडे यांनी केली आहे.

देशात लोकसभा निवडणूक आताच पार पडली. येत्या २३ मे ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. याचदरम्यान विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकज मुंडेंवर बीडमध्ये भाजपला मतदान न झालेल्या बूथची यादी मागवली असा आरोप करत ईव्हीएम हॅकिंगची शंका असल्याचे म्हंटले होते.

Loading...

दरम्यान पंकज मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. बीडमध्ये अजून तरी कोणत्याही बूथची यादी मागवलेली नाही. निकालानंतर आपल्याला कोणत्या भागात किती मतदान झालं याची माहिती प्रत्येक नेत्यालाच मिळतं असते. असे पंकज मुंडेनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, शिवाय निवडणुकीत कोणत्या भागातून आपल्याला किती मतदान झालं याचा आढावा प्रत्येक जण घेतो, आणि धनंजय मुंडेंनीही तो आढावा घेतलाचं असेल. मग यात गैर काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

याचबरोबर, धनंजय मुंडे माझे बंधू आहेत, मी त्यांना लहानपणापासून ओळखते,त्यांना हवेत बन सोडायची सवय आहे. खोटं बोल पण रेटून बोल एवढंच ते करतात. असेही त्यांनी म्हंटले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका