परळीत बहिणीचा ‘गांव तिथे विकास’ दौरा भावाच्या ‘हल्लाबोल’ यात्रेला उत्तर देईल का ?

dhananjay munde vr pankaja munde

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघात गांव तिथे विकास दौऱ्याला सुरवात केली. परळी मतदार संघ भाऊ-बहिनाचा मतदार संघ म्हणून ओळखल्या जातो. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा गांव तिथे विकास दौरा धनंजय मुंडे यांच्या हल्लाबोल यात्रेला उत्तर देईल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे पंकाजाताई मुंडे देखील मैदानात उतरल्या आहे.

पंकजा मुंडे यांनी गांव तिथे विकास दौऱ्याच्या माध्यमातून मुंडे साहेबांवर मतदारांनी केलेल्या प्रेमाची परतफेड विकासानेच होवू शकते. त्यामुळे संपूर्ण ताकद आपण यासाठी पणाला लावू असा निर्धार केला आहे. पंकजा मुंडे परळी मतदार संघातील गावांमध्ये जाऊन विकासकामांचा धडाका लावलाय. पंकजा मुंडे यांनी आतापर्यंत धारावती तांडा, लेंडवाडी, चांदापूर, नागदरा, दौंडवाडी, सेवानगर तांडा इत्यादी गावांमध्ये विकास दौरा राभावला. पंकजा मुंडे यांनी ग्रामपातळीपासून मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.

हल्लाबोल यात्रेदरम्यान परळीकरांनी धनंजय मुंडे यांच्यामागे आपली सर्व ताकद लावलेली दिसली. स्व. पंडितअण्णा आज हयात असते तर आपल्या मुलाला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांना वेगळेच समाधान मिळाले असते. बीडचे पालकमंत्रीपद कुणाकडेही असले तरी बीडचा विकास करण्याची धमक फक्त धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे. असे विधान अजित पवार यांनी केले होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.