मोठी बातमी : 3 जूनला पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर येणार नाहीत…

pankaja munde gopinath

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी नियोजित परळीचा दौरा रद्द केला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना हा दौरा रद्द करण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देत पंकजा मुंडेंनी हा निर्णय घेतला आहे. त्या गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी घरी राहूनच अभिवादन करणार आहेत.

येत्या बुधवारी म्हणजे 3 जून रोजी गोपीनाथ मुंडेंचा सहावा स्मृतिदिन आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. त्यानिमित्त बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना प्रवासाची परवानगी दिली होती, मात्र प्रवास टाळण्याची विनंतीही केली होती. या विनंतीला मान देत पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी घरी राहूनच मानवंदना देण्याचा निर्णय घेतला.

मोदींसमोर टिकेल असा एकही नेता आज नाही, सामनातून मोदींची स्तुती

परळीत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे त्या दिवशी गोपीनाथगडावर जाणार आहेत. समर्थकांनाही त्यांनी आधीच घरी राहून स्मृतिदिन साजरा करण्याची सूचना दिली आहे.

दरम्यान, गोपीनाथ गडावर साध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे लाईव्ह होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी येऊ नका, असा संदेश पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता.

चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणास ‘या’ नियमांचे पालन केले तरच मिळणार परवानगी