ब्रेकिंग : पंकजा मुंडे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर

pankaja munde gopinath

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असल्याचं माहित होतं. म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा सईद शूजा या अमेरिकन हॅकरने केलाय. विरोधकांनी आता गोपीनाथ मुंडेंच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, कथित अमेरिकन हॅकरने केलेल्या दाव्यानंतर भारतात खळबळ माजली आहे.

दरम्यान, या सगळ्यानंतर मुंडे कुटुंबियांकडून अजून देखील काही अधिकृत प्रतिक्रिया आली नसून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या मंत्रिमंडळ बैठकीला देखील गैरहजर राहिल्या आहेत. तब्बेत ठीक नसल्याने मुंडे बैठकीला गैरहजर असल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकन हॅकर सईद शूजा याच्या दाव्यानंतर पंकजा मुंडे यांचा रक्तदाब वाढल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर या सगळ्या प्रकरणावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.