पंकजा मुंडे यांच्या भावाच्या कारला अपघात;एक ठार, चार जखमी

कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली.

टीम महाराष्ट्र देशा- राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ रामेश्वर मुंडे यांच्या गाडीचा रविवारी रात्री अपघात झाला. अंबेजोगाई शहाराजवळील अंबासाखर रोडवरील वळणावर हा अपघात झाला. रामेश्वर मुंडे त्यांच्या कारमधून अंबेजोगाईच्या दिशेने जात होते त्यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली.
या अपघातात चौघे जखमी झाले असून कारमधील धनराज कचरू बिडगर यांचा मृत्यू झाला. तर रामेश्वर व्यंकटराव मुंडे ज्ञानोबा नाथराव कराड, विलास सोपान जाधव आणि परमेश्वर दवणे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

You might also like
Comments
Loading...