fbpx

‘यह तो एक झाकी है’ म्हणत पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला धक्का !

टीम महाराष्ट्र देशा : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा गांव तिथे विकास दौरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रत्येक गावात जात पंकजा मुंडे यांनी विकास कामांचा शुभारंभ करण्यास सुरवात केली आहे. त्याचबरोबर आपले राजकीय वजन सुद्धा पंकजा मुंडे वाढवत असल्याच दिसत आहेत.

यह तो एक झाकी है’ म्हणत पंकजा मुंडे यांनी परळी तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायतीचे सरपंच पार्वतीबाई मुंडे व त्यांचे पती सुंदर मुंडे यांच्यासह शेकडो कार्यकत्यांचा भाजपात प्रवेश करून घेत मांडावा हे गाव विकासासाठी दत्तक सुद्धा घेतले. हे गाव दत्तक घेताच पंकजा मुंडे यांनी ४० लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ केला आहे.

दरम्यान, गांव तिथे विकास दौऱ्या अंतर्गत पंकजा मुंडे यांची मांडावा येथे जंगी सभा झाली या सभेत पंकजायांनी धनंजय मुंडे आणि पवार कुटुंबावर नाव न घेता चांगलाच हल्ला चढवला. लोकनेते मुंडे साहेबांनी मतदारसंघात विकासाचा सागर आणला परंतु त्या काळात काम करणाऱ्या लोकांनी खालपर्यंत विकासच पोहोचू दिला नसल्याने हा भाग तसाच राहिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेत असताना त्यांच्या आताच्या नेत्यांनी या भागात एकही काम केले नाही. प. महाराष्ट्रातले नेते येथे येऊन फक्त घर फोडण्याचे काम करतात अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

सरपंच पार्वतीबाई मुंडे, त्यांचे पती सुंदर मुंडे, ग्रामपंचायत सदस्य रुक्मिनबाई चाटे, अन्तिका माने, यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.