पंकजा मुंडेंनी चालवला लोकनेत्याचा खरा वारसा, शेतमजुराच्या पोराच्या शिक्षणाला केली मदत

टीम महाराष्ट्र देशा : शेतमजुराच्या मुलाने ‘आकांक्षापुढती गगन ठेंगणे’ या पंक्ती आपल्या जिद्दीने सत्यात उतरवल्या असल्या तरी परिस्थितीने मात्र त्यास जागीच जखडून ठेवले आहे. ही संघर्षकथा आहे भोगजी येथील गोरख मुंडे या विद्यार्थ्याची. आईविना पोरक्या असलेल्या या शेतमजुराच्या मुलाचा ‘मेडीकल’ प्रवेश निश्चित झाला खरा. परंतु, यासाठी लागणारी लाखोंची रक्कम आणायची कोठून? असा प्रश्न शेतमजूर मुंडे कुटुंबासमोर उभा ठाकला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका होतकरु कुटुंबातील एका मुलाला चांगले गुण मिळूनही त्याचं डॉक्टर बनायचं स्वप्न पूर्ण होतंय की नाही, अशी त्याला धाकधूक होती. मात्र ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंना त्या मुलाची माहिती मिळाली. त्यांनी ताबडतोब त्या मुलाला दीड लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. संघर्षकन्या हे बिरूद मिरवणाऱ्या पंकजा मुंडे यांनी या कृतीतून ते खर करून दाखवलंय.

उस्मानाबाद जिल्ह्यातील गोरख मुंडे या विद्यार्थ्याने NEET परिक्षेत 505 गुण मिळवले. त्याचा सोलापूरमधील आश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात क्रमांक मिळाला. तो एमबीबीएसला जाणारा गावातला पहिला विद्यार्थी ठरला. मात्र अर्थिक परिस्थीतीमुळे तो हतबल झाला होता. गोरखच्या सर्व परिस्थितीचं वृत्त एका वेबपोलर्टने दिलं होतं. हे वृत्त पंकजा मुंडेंनी वाचल्यानंतर त्या वृत्ताला कमेंट करत त्यांनी मदत जाहीर केली आहे.

कृपया माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा. आपला प्रश्न मला व्यथित करतोय… मी माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करते. गोपिनीथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे आपल्या पुढील शिक्षणासाठी 1 लाख 51 हजार रुपयांची मदत करण्याची इच्छा आहे, अशी कमेंट पंकजा मुंडेंनी केली आहे. गोरख शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयानेही त्याला 50 हजारांची मदत केली असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

सोलापुरात राष्ट्रवादीनंतर कॉंग्रेसच्या ‘या’ दोन नेत्यांनीही मारली मुलाखतीला दांडी

मी केवळ संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो, रोहितचे खळबळजनक ट्विट

#पक्षांतर : हा तर राजकीय भ्रष्टाचार; धनंजय मुंडेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

विश्वासदर्शक ठरावानंतर विधानसभेचे सभापती रमेशकुमार यांचा राजीनामा