नारायणगडासाठी पंकजा मुंडेंनी घोषणा केली, निधी मात्र दिला नाही-धनंजय मुंडे

pankaja munde

बीड: श्री.क्षेत्र नगद नारायणगडाच्या विकासासाठी लवकरच २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सोमवारी (दि.२२) पालकमंत्र्यांनी गडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्याशी संवाद साधला.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, भाजप सरकारच्या काळात गडाच्या विकासासाठी २५ कोटी देऊ, असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले होते. यातील दोन कोटींच्या कामांना मान्यता मिळाली. मात्र, उर्वरित निधी देण्यात आलेला नाही. आपण या गडाचे भक्त असून गडाच्या विकासासाठी जे -जे करता येईल ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नगद नारायण गड येथे राज्यातून भाविक येत असतात, हा गड धाकटी पंढरी म्हणून ओळखला जातो. नारायणगडाच्या विकासासाठी कायम सहकार्याची भूमिका असेल. या धाकट्या पंढरीचा विकास करण्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे, यापेक्षा आनंदाचा क्षण दुसरा कुठला असू शकतो, अशा भावना यावेळी मुंडे यांनी व्यक्त केल्या. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, बळीराम गवते यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या