मुंडे आणि खडसे गोपीनाथ गडावरचं भूमिका स्पष्ट करणार, ‘या’ नेत्याने केले सूचक विधान

टीम महाराष्ट्र देशा : भाजप पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे हे उद्या गोपीनाथ गडावर आपली भूमिका स्पष्ट करून निर्णय संघातील असे सूचक वक्तव्य ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केले आहे. पक्षात ज्येष्ठ असूनही या दोन्ही नेत्यांवर पक्षाकडून अन्याय करण्यात आला. त्यामुळे उद्या १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे निर्णय घेतील असे वक्तव्य शेंडगे यांनी केले आहे.

tv9 या वृत्तवाहिनीशी बोलताना शेंडगे यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, गेल्या ५ वर्षात पंकजा मुंडे यांना भाजपाने डावललं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्याची मुलगी असूनही त्यांना सातव्या स्थानावर फेकण्यात आलं. तर चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात दुसऱ्यास्थानावर आणण्यात आलं.

तसेच एकनाथ खडसे यांच्याबाबतीतही इतकी वर्ष पक्षासाठी काम करुन त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन मंत्रिमंडळातून राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांना सहभागी करुन घेतले जात नाही. यंदाच्या निवडणुकीत त्यांना पक्षाने तिकीटही नाकारलं, मुलीचाही पराभव केला गेला. त्यामुळे पक्षाकडून ओबीसी नेत्यांची अवहेलना सुरु आहे, असे शेंडगे म्हणाले.

दरम्यान उद्या 12 डिसेंबर हा दिवस गोपीनाथ मुंडे यांचा जयंती दिन म्हणून साजरा केला जातो. यासाठी गोपीनाथ गडावर भव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. उद्याही गोपीनाथ गडावर मेळावा होणार आहे. मात्र हा मेळावा खास असणार आहे. कारण भाजप पक्षावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे या उद्या भूमिका स्पष्ट करणार आहेत. यबाबत त्यांनी एक फेसबुक पोस्ट देखील केली होती.

‘आपण मला वेळ मागत आहात, मी आपल्याला वेळ देणार आहे. पुढील मार्ग व दिशा ठरवण्यासाठी, आपली शक्ती काय व लोकांची अपेक्षा काय हे पाहून पुढील निर्णय घेण्यासाठी सर्वजण १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर या’, या आशयाची भावनिक पोस्ट शेअर करत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसह सर्वांना बुचकळ्यात टाकलं आहे.

महत्वाच्या बातम्या