fbpx

नाथाभाऊंचा आदेश आम्हाला शिरसावंद्य असेल : पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : नाथाभाऊ (एकनाथराव खडसे) यांनी दिलेला आदेश आम्हाला शिरसावंद्य असेल . एवढे ते सिनिअर आहेत की मंत्रिमंडळात माझ्यासह राज्यातील कोणत्याही ते मंत्र्याला आदेश देवू शकतात असे मत राज्याच्या महिला व बालकल्याण, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. भुसावळ येथे बहिणाई महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी बोलतांना मुंडे म्हणाल्या, महिलांना जीवनात नेहमी संघर्षच करावा लागतो, कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या अरे..संसार..संसार या काव्यातून हे स्पष्टपणे मांडले आहे. बहिणाईसारख्या महोत्सवातून आपल्या भागातील तसेच राज्याची कला व संस्कृतीची जोपासना होते, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबाबत बोलतांना त्या म्हणाल्या, नाथाभाऊ आज माझ्यासह राज्यातील कोणत्याही मंत्र्याला आदेश देवू शकतात. एवढे ते सिनिअर आहेत. त्यांचा आदेश आम्हाला शिरसावंद्य आहे.

1 Comment

Click here to post a comment