पंकजा मुंडे यांच्या हस्ते धनंजय मुंडेंच्या ताब्यातील पंचायत समित्यांचा गौरव

dhananjay mundhe and pankaja munde 2

मुंबई : राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील दोन पंचायत समित्यांनी पंकजा मुंडे मंत्री असलेल्या ग्रामविकास खात्याची पारितोषिके पटकावली आहेत. राज्याच्या ग्रामविकास खात्याच्या वतीने यशवंत पंचायत राज अभियानात उत्कृष्ट काम करणा-या पंचायत समित्यांना पारितोषिक दिली जातात. हा कार्यक्रम काल  मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदीरात राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

औरंगाबाद महसुली विभागातून या अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल ९ लाख रुपयांचा पहिला पुरस्कार बीड जिल्हयातील अंबाजोगाई पंचायत समितीला तर ७ लाख रुपयांचा पुरस्कार दुसरा परळी पंचायत समिती मिळाला. या दोन्ही पंचायत समित्या पंकजाताई मुंडे यांच्या मतदार संघातील असून त्यावर सत्ता मात्र धनंजय मुंडे यांची आहे.

ग्रामविकासाच्या योजना सरपंचांना ‘सोशल मिडिया’द्वारे कळविणार – पंकजा मुंडे

घरका भेदी असल्याने बिभीषणाला आजही मानत नाहीत; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना नाव न घेता टोला !

आज पुन्हा एकदा रंगणार मुंडे-पवार यांच्यात जोरदार ‘वाकयुद्ध’