राजकारणातल्या सर्वात दिग्गज भाऊ-बहीणीची गळाभेट

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात लोकप्रिय आणि दिग्गज मानले जाणारे आणि अनेक वर्षांपासून दुरावलेले भाऊ-बहिण यांच्या गळाभेटीचा दुर्मिळ योग महाराष्ट्राने पहिला आहे. लोकमत वृत्त समूहाच्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इअर’ पुरस्कार सोहळ्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी गळाभेट घेतली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना राजकीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्काराने गौरविण्यात आले. तेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षापासून दुरावलेले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना अशा रीतीने जवळ आलेले पाहून या दोघांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत आहेत. वेळप्रसंगी एकमेकांवर चेखलफेक करणाऱ्या या नेत्यांनी एकत्र यावं अशी सुप्त इच्छा असणारे कार्यकर्ते आता तस उघडपणे बोलून या भावा बहिणीच्या मनोमिलनाची चर्चा करू लागले आहेत.

1 Comment

Click here to post a comment