पंकजा मुंडे ,अमरसिंह पंडित,जयदत्त क्षीरसागर,रजनी पाटील कुणाला मिळणार विधानपरिषदेची आमदारकी ?

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा परळीतून पराभव झालेला आहे. त्यांचे नावही यासाठी आघाडीवर आहे. मात्र, त्या नेत्या असल्याने पुनर्वसनाची गरज नाही असे समर्थकांचे म्हणणे आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांचेही नाव आघाडीवर आहे. मधल्या काळात पक्षातील तथाकथित बंडात त्यांनी बजावलेली भूमिका आणि जिल्ह्यात पक्षाचे सामाजिक बॅलेन्स करण्यासाठी म्हणून त्यांचे नाव आघाडीवर येत आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्याही ते विश्वासातले आहेत.

शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांनाही विधान परिषदेवर संधी मिळेल, असा समर्थकांना विश्वास आहे. शिवसेनेतील मातब्बर असलेल्या क्षीरसागरांचा विधानसभेत पराभव झाला.माजी खासदार रजनी पाटील या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहूल गांधी या दोघांच्याही जवळच्या आहेत. त्यांच्याकडे हिमाचल प्रदेश काँग्रेसचे प्रभारीपद असून एखाद्या राज्याचे प्रभारी ही मानाची जबाबदारी मानली जाते.

Loading...

येत्या एप्रिल महिन्यात विधान परिषदेच्या सात जागांसाठी निवडणुक आहे. आमदारांतून निवडुण द्यायच्या जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपचे तीन आमदार सहज विजयी होतील असे सरळ गणित आहे. तर, महाविकास आघाडीचे चार आमदार विजयी होतील. आणि राज्यपाल नियुक्त्यांमध्ये सहाजिकच महाविकास आघाडीच्याच बारा जणांना आमदारकी मिळणार यात तीळमात्र शंका नाही.

भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर व काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या सदस्या आणि हिमाचल काँग्रेसच्या प्रभारी रजनी पाटील यांची नावे चर्चेत आहेत.पक्षासाठी योगदान देणाऱ्या किंवा राजकीय नेत्यांचे पुनर्वसन म्हणून विधान परिषदेवर आमदारकी दिली जाते. राज्यपाल नियुक्त्या ह्या विशिष्ट योगदान दिलेल्यांसाठी असल्या तरी अलिकडे यातही सत्ताधारी पक्षांच्याच नेत्यांच्या नेमणूका होतात. पुढील दीड महिन्यात विधानसभेतील आमदारांतून निवडून द्यायच्या आणि त्यानंतर महामहीम राज्यपाल नियुक्त अशा विधान परिषदेच्या साधारण १९ जागा भरल्या जाणार आहेत. तर विनोद तावडे ,एकनाथ खडसे ,चंद्रशेखर बावनकुळे यांचही नाव चर्चेत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?