घरका भेदी असल्याने बिभीषणाला आजही मानत नाहीत; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना नाव न घेता टोला !

टीम महाराष्ट्र देशा : भेंडेवाडी तालुका मुखेड येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून उभारलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडले. दरम्यान , पंकजा मुंडे बोलत होत्या.

“रामायणात रामाला मदत करणाऱ्या बिभीषणाला समाज आजही मान्य करत नाही कारण तो घर का भेदी होता.” असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेना नाव न घेता लगावला.

“उतावीळ नवरा आणि गुडघ्याला बाशिंग” अस राजकाराण माझ नाही. तोडपाणीचे राजकारण करणारे काही नेते माझ्यावर आरोप करत असतात. तुमच्या प्रेमामुळे त्यांचा मला घेरण्याचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

भविष्यात मुंडेंच्या या लेकीकडून आभिमान वाटेल असेच काम होईल. तसेच लोकवर्गणी करून तुम्ही पुतळा उभारला. तुमच मन खूप मोठ आहे. हे माझ्यावर कर्ज आहे. प्रेमाच्या या ऋणातून मुक्त होणे कदापि शक्य नाही. पण तुमच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.