सोलापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहेत. यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा ही माझी बहीण आहे मात्र त्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आहेत.
त्यामुळे त्यांच्या पक्षातील गोष्टीवर मला बोलण्याचा अधिकार नाही. कोणत्याही पक्षात हस्तक्षेप करणे योग्य नाही. असं सूचक वक्तव्य महादेव जानकर यांनी केलंय. विधान परिषदेच्या समर्थनासाठी अद्याप महाविकास आघाडी किंवा भाजपकडून फोन आलेला नसल्याचं महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं. संसदीय दलाच्या मिटिंगमध्ये काय निर्णय होणार आणि राष्ट्रीय समाज पक्ष कुणाला मतदान करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलय.
महत्त्वाच्या बातम्या –