Share

Main Atal Hoon | ‘मैं अटल हूँ’ चित्रपटातील पंकज त्रिपाठींचा पहिला लूक आऊट

Main Atal Hoon | मुंबई: बॉलीवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) गेल्या काही दिवसांपासून ‘मैं अटल हूँ’ (Main Atal Hoon) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पंकज त्रिपाठी यांनी आतापर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये ते कधी विनोदी, संवेदनशील तर कधी नकारात्मक भूमिकेमध्ये दिसले आहे. तर, आता पंकज त्रिपाठी त्यांच्या आगामी चित्रपटामध्ये भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

आज अटल बिहारी बाजपेयी यांच्या बायोपिक मधील पंकज त्रिपाठींचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. या फोटोच्या माध्यमातून चित्रपटातील अनेक बाजू दिसल्या आहेत. यामध्ये राजकारणी, पंतप्रधान, कवी इत्यादींचा समावेश आहे. या चित्रपटामध्ये ही भूमिका साकारण्यासाठी पंकज त्रिपाठी यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचा अंदाज यावरून आला आहे.

पंकज त्रिपाठी यांनी चाहत्यांसोबत या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा लुक शेअर करत त्यांनी लिहिले आहे की,”मोठ्या पडद्यावर अटलजींची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली आहे. यासाठी मी खूप आभारी आहे.” दोन दिवसांपूर्वी पंकज त्रिपाठी यांनी या चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी लिहिले होते की,”खूप उत्साह, खूप भीती आणि त्याबरोबर मनामध्ये अनेक भावना. अटलजींच्या भूमिकेसाठी हे सर्व समर्पित, मी अटल आहे. मोठ्या पडद्यावर अटलजींची भूमिका साकारने खरोखरच एक परीक्षा आहे. या परीक्षेसाठी त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे.”

‘मैं अटल हूँ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. त्यांनी देखील या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट ‘द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अँड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Main Atal Hoon | मुंबई: बॉलीवूड अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) गेल्या काही दिवसांपासून ‘मैं अटल हूँ’ (Main Atal Hoon) …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now