fbpx

पंकजा मुंडे यांनी कुटुंबासह घेतले गोपीनाथ मुंडेच्या समाधीचे दर्शन

pankaja

बीड : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळे आज गोपीनाथ मुंडे यांच्या 68 व्या जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र तरीदेखील त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. आज जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यावेळी परिवारासह गडावर उपस्थित राहणार आहेत. वैद्यनाथ साखर कारखाना हा गोपीनाथ मुंडे यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. याच कारखान्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आयोजित केलेले सामाजिक उपक्रमांचे सर्व कार्यक्रम रद्द करून, शोकाकूल कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.