fbpx

केंद्रात गडकरी राज्यात मुंडे, दर्जेदार रस्त्यांसाठी पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बीड जिल्ह्यासाठी 330 कोटी 89 लाख रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून सर्वच्या सर्व म्हणजे अकराही तालुक्यातील 522 किलोटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात येणार आहे. दरम्यान, या कामाच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामविकास विभागाने नुकतेच काढले आहेत.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सत्तेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला विविध विभागांतर्गत कोट्यवधी रुपयाचा निधी मिळवून दिला. आज जिल्ह्यामध्ये विकासाची जी कामे दिसत आहेत, तो याचाच परिपाक आहे. ग्रामविकास मंत्री या नात्याने त्यांनी जिल्ह्यासाठी प्रत्येक योजना मंजूर करून घेतली. याच खात्याच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून त्यांनी यापुर्वीही मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. आता जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे अकराही तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संशोधन व विकास अंतर्गत 330 कोटी 89 लाख रुपये मंजूर करून प्रशासकीय मान्यताही मिळवुन दिली. या निधीतून जिल्ह्यातील रस्ता दर्जोन्नतीचे 110 कामे होणार आहेत.

प्रशासकीय मान्यता मिळालेल्या निधीची तालुकानिहाय आकडेवाडी पुढीलप्रमाणे

बीड – 24 कामे -61 कोटी 19 लाख (97.30 किमी),

शिरुर कासार – 7 कामे-24 कोटी 15 लाख (39.62 किमी),

पाटोदा-3 कामे – 7 कोटी 79 लाख (17.37 किमी),

आष्टी- 6 कामे – 18 कोटी 2 लाख (30.15 किमी),

परळी वैजनाथ – 11 कामे- 42 कोटी 86 लाख (64.07 किमी),

अंबाजोगाई – 30 कामे – 79 कोटी 30 लाख (121.47 किमी),

केज – 11 कामे- 48 कोटी 84 लाख (81.46 किमी),

माजलगाव – 5 कामे -6 कोटी 65 लाख (10.25 किमी),

धारुर – 5 कामे – 16 कोटी 75 लाख (24.05 किमी),

गेवराई – 3 कामे – 8 कोटी 42 लाख (10.95 किमी),

वडवणी -5 कामे-12 कोटी 17 लाख (25.22 किमी)

या सर्व कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाल्याने लवकरच ही कामे सुरू होऊन ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती होणार आहे.