पंकज! ‘भुजबळ’ साहेबांच्या तब्येतीची काळजी घे- उद्धव ठाकरे

मुंबई : छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले असता. सुमारे 15 मिनिटं उद्धव ठाकरे आणि पंकज भुजबळ यांची भेट झाली. या भेटीवेळी मिलिंद नार्वेकर हेसुद्धा उपस्थित होते.दरम्यान, छगन भुजबळ यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी पंकज भुजबळ यांना दिला.

सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून छगन भुजबळ यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला होता. तर महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा झालाच नसल्याची भूमिका शिवसेनेने पूर्वीपासून घेतलेली आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांना जामीन मिळण्यापूर्वी समीर भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आता जामीन मिळाल्यानंतर समीर यांनी उद्धव ठाकरे यांचा वेळ मागताच उद्धव ठाकरे यांनी भेटीला वेळ दिला आहे. सामना मधील सहानभूतीच्या भूमिकेनंतर या भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. थोड्याच वेळात या भेटीचा तपशील बाहेर येण्याची शक्यता आहे.

Loading...

भुजबळांची तोफ धडाडणार ! भाषणाची तारीख ठरली

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून दोन वर्षांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर, त्यांच्यावर केईएममध्ये उपचार सुरु आहेत. आता तिथून बाहेर पडल्यानंतर जोरदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत.आपल्या वेगळ्या भाषणशैली साठी प्रसिद्ध असणाऱ्या भुजबळांच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्टाचं लक्ष असणार आहे.
पुण्यात 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ हे जाहीर भाषण करणार आहेत.याच ठिकाणी भुजबळांची तोफ धडाडणार आहे.

छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. काही कार्यकर्त्यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली. मात्र सर्वसमान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी भुजबळ समोर कधी येतील, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र आता हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या सभेतच भुजबळ भाषण करतील, हे निश्चित झाले आहे.

भुजबळ पुन्हा राजकीय मैदानात उतरणार आहेत. मात्र त्यासाठी अजून महिनाभर वाट पाहावी लागणार आहे.  दरम्यान भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल 2 वर्षानंतर जामीन मंजूर केला आहे. भुजबळ यांनी २ एप्रिल रोजी जामिनासाठी अर्ज केला होता, न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने आज जामीन मंजूर केला . त्यामुळे गेली दोन वर्षापासून तुरुंगात असणारे भुजबळ यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च २०१६ पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी २०१६ पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टाने तसेच मुंबई उच्च न्यायालयानं छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे ४५ (१) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामिनावर मुक्तता करण्याची मागणी भुजबळ यांनी केली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी