काय आहे सुंदर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या व्हायरल फोटो मागील सत्य ?

blank

टीम महाराष्ट्र देशा: सोशल मिडीयावर काय व्हायरल होईल आणि त्यामुळे कोणती व्यक्ती ट्रेंडमध्ये येईल हे सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला एखादा मेसेज किंव्हा फोटो मागील सत्य माहित नसत मात्र आपल्याला आवडल तर आपण पुढे फोरवर्ड करतो. सध्या सोशल मीडियावर एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या सौंदर्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. मात्र या व्हायरल फोटो मागील सत्य वेगळच आहे.

या फोटोमध्ये दिसणारी महिला ही पोलीस नसून अभिनेत्री कायनात अरोरा ही आहे. ‘जग्गा जेऊंदा ए’ या पंजाबी चित्रपटासाठी कायनातने पोलिसांच्या वेश धारण केला आहे. खुद्द कायनात हिनेच इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्पष्टीकरण देत अशा प्रकारे पंजाब पोलिस दलातील एसएचओ व्हायरल होत असलेले फोटो चुकीचे असल्याच म्हंटल आहे.