पाणीपुरी विक्रेता झाला अटल बिहारी वाजपेयी

टीम महाराष्ट्र देशा : ‘द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट दर्शकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षात अनेक बायोपिक्स रिलीज होणार असून द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा देखील त्यातलाच एक चित्रपट आहे. या चित्रपटातून मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ उलघडून दाखवणार आहेत. या चित्रपटात मनमोहन सिंग यांची भूमिका अनुपम खेर या बड्या कलाकाराने साकारली आहे. या चित्रपटात अनेक आजी माजी नेते पहायला मिळणार आहेत. त्यासाठी कोणता कलाकार कोणत्या नेत्याची भूमिका साकारणार आहे हे दर्शकांसाठी उत्सु्क्तेच ठरणार आहे.

‘द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटात अट्टल बिहारी वाजपेयी यांचे काही प्रसंग दाखवले आहेत. अट्टल बिहारी वाजपेयी यांच्या भुमिका साकारण्यासाठी चित्रपटात चक्क एका पाणीपुरी विक्रेत्याची निवड करण्यात आली आहे.राम अवतार भारद्वाज असे या कलाकाराचे नाव असून त्याचे हास्य वाजपेयींसारखंच असल्याने त्याची निवड करण्यात आल्याच चित्रपटाच्या दिग्दर्शका कडून सांगितल जात.राम अवतार भारद्वाज याला अभिनय येत नसल्याने त्याच्याकडून अभिनय करून घेणे हे आव्हानात्मक होत. असे देखील चित्रपटाचे दिग्दर्शक विजय यांनी सांगितले.