“प्रभागातील मुस्लीम नागरीकांमध्ये दहशत, माझी अडचण होतीये”; वसंत मोरे

पुणे : राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावर क्रिया-प्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत. आता मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपले मत मांडले आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर प्रभागातील मुस्लीम नागरीकांमध्ये संभ्रम होत असल्याचा त्यांनी म्हंटले आहे. अनेकांनी फोन करून नाराजी व्यक्त केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली .

वसंत मोरे म्हणाले की, ‘कालपर्यंत आम्ही ज्यांना चाचा, मामू, खाला म्हणत होतो, त्यांच्यातच नाराजी निर्माण होत असेल तर हे फार अडचणीच ठरतंय. सध्या रमजान सुरू आहे. मला माझा प्रभाग शांत हवाय. काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले आहेत. अनेक मुस्लीम कार्यकर्ते नाराज आहेत, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मशीदीवर भोंगे लावण्याच्या मुद्द्यावर मोरे म्हणाले, मशिदीवरील भोंगे हा कायद्याचा मुद्दा आहे. कायदेशीर बाबींचा पूर्तता होते की नाही ते राज्य सरकारने पाहावे. गरज असेल तिथे कारवाई करावी.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आता लखनऊचे शिलेदारही धावणार; मुंबईच्या पोराला देणार आव्हान!
“ये लो कॅलरी जेवण…” रितेश देशमुखचा ‘हा’ मजेदार व्हिडिओ पाहिलात का?
“…दंगल वगैरे सगळ्या राष्ट्रवादीला हव्या असलेल्या गोष्टी”; मनसेचे टीकास्त्र
गिलख्रिस्ट आणि रोहितचा डेक्कन चार्जर्स संघ आठवतोय का? आता हा संघ का खेळत नाही?
महागाई आणि बेरोजगारीचे काय? नाना पटोलेंचा केंद्राला सवाल