दुष्काळाचे निवारण करण्यासाठी सिनेअभिनेता ‘अमीर खान’ पुन्हा सज्ज

मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळाचे निवारण करण्यासाठी सिनेअभिनेता अमीर खान गेले तीन वर्षे पाणी फाउंडेशनच्या वतीने ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धा आयोजित करत आहे. या वर्षी देखील ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९’ या चौथ्या पर्वा ची घोषणा त्याने केली. ही घोषणा मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवस्थानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अभिनेता अमीर खान , किरण राव , सत्यजित भटकळ यांच्या उपस्थितीत झाली.

ही स्पर्धा पुढील वर्षी ८ एप्रिल ते २२ मे २०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आली असून काही विजेत्या गावांना काही रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. विजेत्या गावांपैकी प्रथम क्रमांकाला 75 लाख, द्वितीय क्रमांकाला 50 लाख आणि तृतीय विजेत्याला 40 लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

याशिवाय प्रत्येक तालुक्यात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत विजयी होणाऱ्या गावांना देण्यात येणाऱ्या एकूण बक्षिसांची रक्कम 9 कोटी 15 लाख रुपये इतकी आहे.