प्रो कबड्डी: पहा अनूप कुमारने कुणाशी घेतला आहे पंगा

सध्या सोशल मीडियावर #BreakTheBeard हा हॅशटॅग जोरदार सुरु आहे. आयपीएल आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेच्या वेळी क्रिकटपटू मोठ्या प्रमाणावर #BreakTheBeard हा हॅशटॅग वापरून आपल्या दाढीला वेगवेगळ्या स्टाईल करताना दिसले.

भारतातील सर्वात प्रसिद्ध लीग कोणती तर अर्थातच प्रो कबड्डी लीग. मग यातील खेळाडू तरी यात कसे मागे असेल. #BreakTheBeard चा पहिला पंगा घेतला आहे यु मुंबाचा कर्णधार अनूप कुमारने.

त्यासाठी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून त्याने एक खास विडिओ प्रसिद्ध केला आहे. ज्यात आधी भारतीय क्रिकेटपटूंनी केलेल्या स्टाइल हो पाहत आहे आणि नंतर स्वतः एक खास स्टाईल करताना तो दिसत आहे. त्यात अनूप म्हणतो पंगा हो जाये.

You might also like
Comments
Loading...