रंगेल हार्दिक पांड्याचा बीसीसीआयनं फेटाळला माफीनामा

टीम महाराष्ट्र देशा : क्रिकेटच्या मैदानात आक्रमक फलंदाजी आणि गोलंदाजी करणारा लोकप्रिय खेळाडू हार्दिक पांड्या आता लोकांकडून सोशल मिडीयावर काहीसा वादाच्या भोवर्यात अडकताना दिसत आहे. .कारण ‘कॉफी विद करण’ या टॉक शो मध्ये हार्दिक पांड्याने महिलांवर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे सोशल मीडियावर हार्दिक पंड्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे तर पांड्यावर कारवाई करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.

Loading...

स्वतःची चूक लक्षात येता ट्वीटर वर हार्दिक पंड्याने माफी मागितली असून. ‘माझा कोणालाही दुखवायचा किंवा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो’, असे स्पष्टीकरण देखील दिले आहे.

के एल राहुल आणि हार्दिक पांड्या कॉफी विद करण या टॉक शो मध्ये आले होते त्यावेळी पंड्या काही किस्से सांगताना म्हणाला की, ‘एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच अडचण नाही आणि मी त्यांच्याशी त्यांच्या ‘उपलब्ध’ असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो, तसेच मी अनेक महिलांसोबत रिलेशनशिप मध्ये होतो आणि ही बाब पालकांनाही माहित होती. जेव्हा मी कौमार्य गमावलं, त्यावेळी आई-वडिलांना ‘आज मी करुन आलोय’ असं सांगितलं होतं. अशा बेताल टिपणी मुळे सामाजिक स्तरातून हार्दिक पंड्यावर टीका होत आहेत.

हार्दिक पांड्याने कॉफी विथ करण कार्यक्रमात केलेल्या धक्कादायक टिपणी मुळे माफी मागितली असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला त्याचं वागणं पटलेलं नाही. त्यामुळेच पांड्यावर कारवाई करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. तसेच कारणे दाखवा नोटीस देखील दिली असून उत्तरास २४ तासाची मुदत दिली आहे.Loading…


Loading…

Loading...