सॉरी भाई,कणखर राहा, हार्दिक पंड्याने ईशान किशनची मागितली माफी

मुंबई : बंगळुरुविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा आयपीएलमधला मुंबईचा हा पहिलाच विजय होता. पण या मॅचमध्ये मुंबईचा विकेट कीपर ईशान किशनला दुखापत झाली. हार्दिक पंड्याने फेकलेल्या थ्रोमुळे विकेट कीपर ईशान किशन जखमी झाला होता. आता हार्दिक पांड्यानं ईशान किशनची माफी मागितली आहे. ट्विटरवरून हार्दिक पांड्यानं ईशान किशनबरोबरचा फोटो शेअर केला आहे. माझा क्यूट पाय, सॉरी भावा, कणखर राहा, असं ट्विट हार्दिकनं केलं आहे.

जसप्रीत बुमराहच्या डावातील १३व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर विराट कोहलीने शॉट लगावला. हा शॉट मिड विकेटवर हार्दिक पांड्याने पकडला. जसा पांड्याने हा चेंडू थ्रो केला तेव्हा हा चेंडू ईशानच्या तोंडावर लागला.ईशानने त्यावेळी हेल्मेट घातले नव्हते. यामुळे तो चेंडू जोरात येऊन चेहऱ्यावर आदळला. हा फटका इतका मोठा होता की इशान खालीच कोसळला.

You might also like
Comments
Loading...