fbpx

पंड्या आणि राहुलला कठोर शब्दांत सुनावण्याची आवश्यकता होती : शास्त्री

टीम महाराष्ट्र देशा– बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘कॉफी विथ करण’ मध्ये पंड्या आणि के एल राहुलला आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी हार्दिक पंड्याने महिलांविषयी वादग्रस्त विधान केले होते. यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. आता याच मुद्द्यांवरून पंड्या आणि के एल राहुल यांना कठोर शब्दांत सुनावण्याची आवश्यकता होती असं मत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं आहे.

नेमकं काय म्हणाले शास्त्री ?

महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या पंड्या आणि राहुलला कठोर शब्दांत सुनावण्याची आवश्यकता होती. जे काही झालं, त्यातून ते काहीतरी चांगले शिकले असतील, असं शास्त्री म्हणाले. तुम्ही चुका करता आणि कधी-कधी तुम्हाला त्याबद्दल शिक्षाही होते. मात्र, जग इथेच संपत नाही. अशा प्रकारच्या अनुभवांतून खेळाडूंना ‘वापसी’ करण्यास मदत मिळते, असंही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

के एल राहुल आणि हार्दिक पांड्या कॉफी विद करण या टॉक शो मध्ये आले होते त्यावेळी पंड्या काही किस्से सांगताना म्हणाला की, ‘एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच अडचण नाही आणि मी त्यांच्याशी त्यांच्या ‘उपलब्ध’ असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो, तसेच मी अनेक महिलांसोबत रिलेशनशिप मध्ये होतो आणि ही बाब पालकांनाही माहित होती. जेव्हा मी कौमार्य गमावलं, त्यावेळी आई-वडिलांना ‘आज मी करुन आलोय’ असं सांगितलं होतं.

2 Comments

Click here to post a comment