रयतच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी पांडुरंग शिंदे यांची निवड

टीम महाराष्ट्र देशा:कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्ष पदी पांडुरंग शिंदे मांजरमकर यांची सदाभाऊ खोत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.

सदाभाऊ खोत यांचे विश्वासू कार्यकर्ते अशी ओळख असणारे पांडुरंग शिंदे हे अनेक वर्षे झाले शेतकरी चळवळीत कार्य करत आहेत. यापुर्वी स्वाभिमानी विध्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थी चळवळ वाढविली होती याकाळात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा वाढीचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारला घेण्यास भाग पाडण्यात शिंदे यांचा महत्वाची भूमिका होती.

सध्या रयत क्रांती संघटनेच्या राज्य प्रवक्ते पदांवर पांडुरंग शिंदे कार्यरत असताना नांदेड जिल्ह्यात अल्प काळातच विविध सामाजिक कार्य,विविध आंदोलनच्या माध्यमातून संघटनेची ताकत निर्माण केली. या कार्याची पावती म्हणून संघटनेची महत्वाची जबाबदारी पांडुरंग शिंदे यांच्यावर संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली.

येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा राज्यात युवकांचे संघटन बांधणी करण्यासाठी एका लढवय्या कार्यकर्ता म्हणून पांडुरंग शिंदे यांची युवा प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी शिवनाथ जाधव (प्रदेशाध्यक्ष,रयत क्रांती संघटना), दीपक भोसले (कार्याध्यक्ष), अच्युत गंगने (सदस्य,राज्य कृषी मूल्य आयोग),प्रा.सुहास पाटील (सदस्य,राज्य कृषी मूल्य आयोग),राहुल मोरे (प्रदेश उपाध्यक्ष),जितू अडेलकर (प्रदेश प्रवक्ते),भानुदास शिंदे (सदस्य, ऊस नियंत्रण समिती)संजय भगत,रविकांत खोत (राज्य उपाध्यक्ष युवा), श्री लोखंडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.