फुंडकर काका गेल्याने तीव्र दु:ख होत आहे – पंकजा मुंडे

pankaja-munde

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं आज दुख:द निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांना आज पहाटे मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहाटे 4.32 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने राज्याने एक मोठ राजकीय नेतृत्व गमावल्याची भावना आहे.

त्यांच्या अकाली निधनाने भाजपसह सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान फुंडकर यांच्या आकस्मित निधनावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. हृदयात रिकामं रिकामं वाटणारी भावना होते जेव्हा आपला कोणी माणूस जातो ! फुंडकर काका गेल्याने असंच वाटत आहे. मुंडे साहेबांचे जीवलग मित्र आमचे कुटुंबातील सदस्य भाजपाचे जेष्ठ नेते कृषी मंत्री हयात नाही. ही न भरून येणारी पोकळी असून, मला तीव्र दुःख होत असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.

राज्यात भाजपच्या विस्तारामध्ये त्याचं खूप मोठं योगदान होतं. ग्रामीण आणि शेती प्रश्नाची जाण असलेला नेता म्हणून फुंडकर राज्यात परिचीत होते. फुंडकर यांनी काही काळ भाजपचं प्रदेशाध्यक्षपदही भूषवलं होतं.