fbpx

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दोन भाऊ भिडणार

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. बरोरा हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचा दारूण पराभव झाला. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजप किंवा सेनेत प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यांच्या या निर्णयाला पांडुरंग बरोरा यांचे चुलत भाऊ भास्कर बरोरा यांचा याला विरोध आहे.

दरम्यान, आमदार पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत बोलताना भास्कर बरोरा म्हणाले की, जर पांडुरंग बरोरा यांना शिवसेनेकडून आगामी विधानसभेची उमेदवारी मिळाली तर मी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करेल, असे भास्कर बरोरा म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीत पांडुरंग बरोरा यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली तर निवडणुकीच्या रिंगणात भावाविरोधात भाऊ अशी लढत पाहायला मिळेल.