मुंबई: देशभरात ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचीच चर्चा रंगली आहे. हा सिनेमा म्हणजे काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचा ज्वलंत इतिहास असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेत्यांनी हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, अशी मागणीही केली आहे. यावरच विधानसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी बोलताना चिंता व्यक्त करत द काश्मीर फाइल्स या चित्रपटामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला आहे. आता यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.
“काश्मीर फाईल्स सिनेमा संपल्यानंतर काही लोक हिंदूंना गोळा करून भाषण करतात. असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विधानसभेत म्हणाले. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, पण महाराष्ट्रात हिंदूंना एकत्र करण्याची चोरी झाली आहे. देवभूमी उत्तराखंड मध्ये मुस्लीम युनिव्हर्सिटी बनवण्याची योजना रेटणाऱ्या अकिल अहमद याला काँग्रेसने सचिवपदी बढती दिल्यामुळे काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. पंडित राहुल गांधी देशात मुस्लीम अजेंडा रेटण्याचा जोरदार प्रयत्न करतायत.”, असा आरोप करणारे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
देवभूमी उत्तराखंड मध्ये मुस्लीम युनिव्हर्सिटी बनवण्याची योजना रेटणाऱ्या अकिल अहमद याला काँग्रेसने सचिवपदी बढती दिल्यामुळे काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. पंडित राहुल गांधी देशात मुस्लीम अजेंडा रेटण्याचा जोरदार प्रयत्न करतायत.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 15, 2022
काय म्हणाले होते गृहमंत्री?
काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराशी संबधित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला करमाफी देण्याची मागणी भाजप सदस्यांनी केली. मात्र, हा चित्रपटाचा खेळ संपला की, चित्रपटगृहाच्या बाहेर लोकांना एकत्र करुन हिंदू जनजागृती विशेष संवादाच्या माध्यमातून धर्म प्रसार केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता झुंड चित्रपटाचे मोफत खेळ दाखविले जात आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या:
- वाढदिवसाला आलियाला मिळाले धमकेदार गिफ्ट; सविस्तर वाचा
- …त्यामुळे भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडले- राजनाथ सिंह
- ‘आता तरी मलिकांचा राजीनामा घ्या’ – अतुल भातखळकर
- ६२ व्या वर्षी घातला सेक्सी ड्रेस; नीना गुप्ता पुन्हा ट्रोल
- “शेतीला दिवसा वीज द्या अन्यथा घोटाळे बाहेर काढू” – राजू शेट्टी आक्रमक
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<