fbpx

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आकुर्डी येथून पुण्याच्या दिशेने प्रस्थान

पुणे : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आकुर्डी येथून आज पहाटे पुण्याच्या दिशेने प्रस्थान झाले असून, आज संध्याकापर्यंत पालखी पुण्यात मुक्कामाला पोहोचेल. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील आज आळंदी येथून पुण्याच्या दिशेने निघणार असून, या दोन्ही पालख्या पुणे शहरात आज दाखल होतील. दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. पोलिसांनी त्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या जयघोषात वारकरी मंडळी पालख्यांमध्ये सहभागी होत पंढरीच्या दिशेनं रवाना होत आहेत. विठूनामाच्या जयघोषात आळंदी आणि देहूतून ज्ञानेश्वर माऊलींची आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी निघाली आहे. त्यातील मानाची दिंडी म्हणजे संत श्री ज्ञानोबा माऊलींची. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीहून निघेल आणि भवानी पेठेतल्या विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात महाराष्ट्रच्या विविध भागातून लाखो भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पुण्यामध्ये विठूनामाचा गजर घुमणार आहे.

पालखीच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज

1 Comment

Click here to post a comment