पालखीच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज

टीम महाराष्ट्र देशा : संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज्यांच्या पालखीचे आगमन उद्या शनिवारी पुण्यात होणार असून, पालखीच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज झाली असून, महापौर मुक्ता टिळक याच्या हस्ते पालखीचे स्वागत होणार आहे.

पालिकेच्यावतीने पालखीदरम्यान 24 तास पाणीपुरवठा, अग्निशमन, आरोग्य विभाग अशी पथके सज्ज आहेत. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, केर कचरा तसेच बंद पडलेली वाहने वाहतूक विभागाकडून उचलण्यात आली आहेत. पालखी सोहळ्या दरम्यान कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी पालिकेच्या वतीने घेण्यात येणार आहे. पालख्यांचा मुक्काम असणाऱ्या ठिकाणची पूर्ण स्वछता करण्यात आली आहे. वारकऱ्यांसाठी निवारा, पाणी, स्वछतागृहांची जागो जागी व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवकांकडून वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये शनिवारी 1 च्या सुमारास दोन्ही पालख्यांचे आगमन होईल .त्यादरम्यान पालिकेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येईल. या पालखी सोहळ्यात डॉक्टरांचे एक पथक देखील आहे. त्याचप्रमाणे पालिका कर्मचाऱ्यांची दिंडी देखील दरवर्षीप्रमाणे सहभागी होणार आहे. शनिवार (7जुलै) आणि रविवारी (8 जुलै) रोजी पालख्यांचे मुक्काम पुण्यात असणार आहेत. त्यानंतर पुढे पंढरीच्या दिशेने पालख्या मार्गस्थ होतील.

छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही फक्त निवडणुकीसाठी वंदन करत नाही- उद्धव ठाकरे

राईनपाड्यातील मुख्य आरोपी महारू पवार अटकेत