सरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस परवानगी

vitthal

टीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस परवानगी देण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाचा सावळा गोंधळ उघड झाला आहे. येत्या सोमवारी कार्तिकी एकादशी आहे. यानिमित्ताने पंढरपूरमध्ये लाखो भाविक विठू माऊलीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे या दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रिवर बंदी घातली जाते. मात्र कार्तिकी यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘कार्तिकी एकादशी’च्या दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.

येत्या सोमवारी कार्तिकी एकादशी आहे. यानिमित्ताने लाखो भाविक पंढरपूरमध्ये विठू माऊलीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे या दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रिवर बंदी घातली जाते. परंतु कार्तिकी यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.