पॅनला आधारकार्ड लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढली…

टीम महाराष्ट्र देशा : अजूनही तुमचं पॅनकार्ड आधारकार्डला लिंक केलं नसेल तर अजिबात घाबरू नका कारण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा केंद्र सरकारने पॅन आणि आधारकार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. यापूर्वी ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्यासाठी आता ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शनिवारी करदात्यांना लिंक करण्यासाठी दिलेली मुदत पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत वाढवली आहे. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी आतापर्यंत ३१ जुलै २०१७, ३१ ऑगस्ट २०१७, ३१ डिसेंबर २०१७, ३० जून २०१८ व आता ३१ मार्च २०१९ अशी पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने बँक खाते, मोबाईल क्रमांक आदीसाठी आधार लिंक करणे अनिवार्य केल आहे. एलपीजी गँसमधील अनुदान आणि इतर योजनांचा लाभ मिळविण्यासाठी केंद्रानं केलेल्या आधार सक्तीचं प्रकरण सध्या सर्वोच्च नायालयात आहे.

‘आरक्षण देणं आमच्या हातात नाही’ ; सरकारने मराठा आरक्षणाबाबत हात झटकले