पनामा कागदपत्र घोटाळा : अमिताभ बच्चनवर आयकर विभागाची नजर !

Panama Bachchan

नवी दिल्ली : पनामा पेपर्स लीक प्रकरणी आयकर विभागाने अमिताभ बच्चन व अन्य काही व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. यामुळे अमिताभ बच्चन यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. घोटाळ्यामध्ये ज्या मान्यवर व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे त्यांची माहिती मिळविण्यासाठी आयकर विभागातील एक वरिष्ठ अधिकारी ब्रिटिश व्हर्जिन आयलंड येथे रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगण्यात आले आहे. पनामा कागदपत्र घोटाळा प्रकरणाशी संबंधित ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर अन्य व्यक्तींची चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. मध्य अमेरिकेतील पनामामधील ‘मोझॅक फॉन्सेका’ या कायदा सल्लागार कंपनीची ११. ५ दशलक्ष गोपनीय कागदपत्रे उघड झाली असून यात जगभरातील राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, चित्रपट कलावंत, क्रीडापटूंनी मालमत्ता लपवण्यासाठी, कर चुकवण्यासाठी पनामा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, जर्सी, बहामा आणि सेशेल्स बेट या देशांमध्ये बोगस कंपन्यांमार्फत पैसा गुंतवल्याचे समोर आले होते.