30 जूनपर्यंत पॅनकार्ड क्रमांक देणे अनिवार्य

बँकेत व्यवहार करण्यासाठी पॅनकार्ड क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत पॅन नंबर जमा करण्याची सूचना बँकाकडून जारी करण्यात आली आहे. अन्यथा तुम्ही तुमच्या खात्यावरून आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत. ज्या खातेदारांकडे पॅनकार्ड नाही त्यांना फॉर्म-60 जमा करावा लागणार आहे.
दरम्यान, बँक खाती पॅनकार्ड क्रमांकाशी जोडून घेण्यास बँकांकडून 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र यामध्ये मुदतवाढ करून  30 जूनपर्यंत तुम्ही पॅन क्रमांक बँकेत जमा करू शकता.
यासंदर्भात बँकांनी आपल्या ग्राहकांना पत्र पाठवून पॅनकार्ड क्रमांक किंवा फॉर्म 60 अ जवळच्या शाखेत जमा करण्यास सांगितले आहे. या पत्रांमध्ये प्राप्तिकर विभागाकडून जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांचा हवाला देण्यात आला आहे. ज्यात बँक खातेदारांसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत पॅनकार्डची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले होते.Loading…


Loading…

Loading...