विश्वजीत कदम यांच्या विरोधात भाजपचे पृथ्वीराज देशमुख रिंगणात

सांगली : पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभेच्या जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून, काँग्रेसच्या वतीनं पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम हे निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी पृथ्वीराज देशमुख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देशमुख 10 मे रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

त्यामुळे आता या पोटनिवडणुकीत चांगलीच रंगत आली असून, विश्वजीत कदम यांच्यासमोर देशमुखांचं तगडं आव्हान असणार आहे. दरम्यान, विश्वजीत कदम यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते अर्ज भरण्यासाठी जमा झाले होते.

या पोटनिवडणुकिसाठी राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे. भाजपने देखील ही निवडणूक बिनविरोध करावी अशी भावनिक साद काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांनी घातली होती. मात्र, भाजप ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

You might also like
Comments
Loading...