दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या काल पुण्यात दाखल झाल्यानंतर पुण्यनगरी वैष्णवांच्या आगमनाने फुलून गेली आहे. निवडुंगा विठोबा मंदिरात तुकाराम महाराजांची तर पासोड्या विठोबा मंदिरात ज्ञानेश्वरांच्या पादुका दर्शनासाठी दर वर्षी ठेवण्यात येतात. पुणेकरांनी पादुकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून लांबच्या लांब रांगा पहायला मिळत होत्या. पुणे तसेच आसपासच्या परिसरातून आलेल्या भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून सुरक्षेचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .