Palkhi- ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील ‘खास’ वारकरी

ज्ञानोबा-तुकाराम नामाच्या गजराने अवघी पुण्यनगरी आज दुमदुमुन निघाली आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आज पुण्यामध्ये विसावणार आहेत. या पालख्यांसोबत लाखो वारकरी आज पुण्यामध्ये आले आहेत. काही खास वारकरी ही दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. असाच आहे हा प्लूटो नावाचा श्वान. प्लूटो हा पुण्यातील सतीश अग्रवाल यांचा श्वान आहे.  गेली सहा वर्षेपासून प्लूटो हा अग्रवाल यांच्या सोबतीने ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत आळंदी ते पुणे असा चालत प्रवास करतो आहे.

हजारोंच्या गर्दीतही प्लुटोची शिस्तबद्धता
गेली सहा वर्षे पालखी सोबत आळंदी ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्लुटोचा सोबतच्या वारकऱ्यांना काही त्रास होत नसल्याचे वारकऱ्यांनी सांगितल.