पालखी सोहळ्यामुळे पुण्यातील प्रमुख मार्गावर वाहतुकीचे बदल

पुणे: संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे.  दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुढील दोन दिवस पुणे शहरात असणार आहे. त्यामुळे शहरात वारक-यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होणार असल्याने मुंबई, सोलापूर, नगर, सातारा, सासवड या मार्गावर वाहतुकीसाठी बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पालखी मार्गावरून न येता पर्यायी  मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पुणे पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

असे असणार बदल आणि पर्यायी मार्ग

मुंबईकडून सोलापूरकडे ये-जा करणा-या वाहनांसाठी

1) तळेगाव येथून इंदुरी, चाकण, शिक्रापूर, वाघोली, केसनंद, कोळवडी, थेऊर मार्गे सोलापूर रोड

2) देहूरोड फाट्याने देहूरोड-कात्रज बायपासने कात्रज जकातनाका, सातारा रोड, कापूरहोळ, नारायणपूर, सासवड बाहेरून नारायणपूर फाट्यावरून जेजुरी, मोरगाव, सुपा, चौफुला मार्गे सोलापूर रोड

मुंबई कडून अहमदनगरकडे ये-जा करणा-या वाहनांसाठी

1) तळेगाव, इंदुरी, चाकण, शिक्रापूर, वाघोली मार्गे अहमदनगर

सोलापूरकडून अहमदनगरकडे ये-जा करणा-या वाहनांसाठी

1) चौफुला येथून केडगाव, पारगाव, न्हावरे गाव फाटा, नगर रोड

साताराकडून सोलापूर व अहमदनगरकडे ये-जा करणा-या वाहनांसाठी

1) सोलापूरकडे-कोपूरहोळ येथून नारायणपूर, सासवड बाहेरून नारायणपूर फाट्यावरून जेजुरी, मोरगाव, सुपा, चौफुला मार्गे सोलापूर

2) अहमदनगरकडे – कोपूरहोळ येथून नारायणपूर, सासवड बाहेरून नारायणपूर फाट्यावरून जेजुरी, मोरगाव, सुपा, चौफुला, केडगाव, पारगाव न्हावरे गाव फाटा, अहमदनगर रोड

पुण्याकडून सासवडकडे ये-जा करणा-या वाहनांसाठी

1) कात्रज, सातारा रोडने कापूरहोळ, नारायणपूर मार्गे सासवड

2) गोळीबार मैदान व मम्मादेवी चौक येथून कोंढवा रोडने सरळ लुल्लानगर, कोंढवा, बोपदेव घाट, सासवड बाहेरील नारायणपूर फाट्यावरून भिवरी, चांबळी मार्गे सासवड