विठुरायाच्या दर्शनाला जाताय मग करा हे अ‍ॅप डाउनलोड

पुणे: डिजिटलच्या युगात आता लाखो वारकऱ्यांचा जिव्हाळा असणारा पालखी सोहळादेखील हायटेक होतोय. कारण आता पुणे जिल्हा प्रशासनाकडून केले जाणारे वारी व्यवस्थापन, तसेच दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती एक क्लिकवर मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून  ‘पालखी सोहळा २०१७’ हे मोबाईल अ‍ॅप विकसीत करण्यात आले आहे. या अ‍ॅपमध्ये व्यवस्थापन, सुविधा आणि सूचना हे तीन विभाग करण्यात आले आहेत. या अ‍ॅपला भाविकांनी देखील चांगला प्रतिसाद दिल्याच दिसून येतय. मागील तीन दिवसात बाराशेजणांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे.

अ‍ॅपच्या माध्यमातून चोवीस तास श्री विठ्ठल-रखुमाईचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. हे अ‍ॅप १२ जूनपासून सर्वासाठी खुले करण्यात आले आहे. आषाढी वारीनिमित्त ९ जुलैपर्यंतच्या कालावधीत पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना अ‍ॅपद्वारे व्यवस्थापनाची माहिती घेता येणार आहे. तसेच अ‍ॅप वापरणे शक्य नसणाऱ्या वारकऱ्यांसाठी पालखी सोहळ्याच्या नियोजनातील व्यक्तींचे दूरध्वनी क्रमांक व इतर माहिती देणाऱ्या माहिती पुस्तिकेच्या दोन हजार प्रतींचे वितरण करण्यात येणार आहे

mobile application for palkhi sohala