पाली-सुधागड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत होणार रुपांतर

Ranjit Patil

नागपुर : रायगड जिल्ह्यातील पाली-सुधागड ग्रामपंचायतीस नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.

एका सदस्याने आज विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती त्या चर्चेत सहभाग घेत आ.सुनिल तटकरे यांनी पाली-सुधागड ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करुन नागरी दर्जा देण्याची मागणी केली. यावर उत्तर देतांना डॉ.पाटील यांनी महाराष्ट्र नगरपरिषद,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ३, कलम ३४१ (अ)(२) व कलम ३४१(अ) (१अ) मधील अटींची पुर्तता होत असल्यास शासनाकडुन करण्यात येते. याबाबत तालुका मुख्यालयातील ग्रामपंचायती व ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दहा हजारापेक्षा जास्त आहे त्यांना नगरपंचायत, नगरपरिषदेत रुपांतर करण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

आ. सुनिल तटकरे यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे पाली-सुधागड ग्रामपंचायतीचे लवकरच नगरपंचायतीत रुपांतर होणार असुन यामुळे पाली-सुधागड परिसराच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे.

६ मे पासून सुरु होणार राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’चा पाचवा टप्पाLoading…
Loading...